सन 2008 पासून मी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतोय. मराठवाड्यातील पदवीधर बंधू-भगिनींनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर जी जबाबदारी सोपवली ती मी यशस्वीपणे पेलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आलोय. माझा आतापर्यंतचा प्रवास, कौटुंबिक पार्श्वभूमी आपल्या समोर ठेवणे मला गरजेचे वाटते…

माझे प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण छत्रपती संभाजीनगरच्या सरस्वती भुवन शाळेत तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथून 1982 साली मी बी.ई.मॅकेनिकल ही पदवी संपादन केली. त्यानंतर सहा वर्ष विविध कंपन्यात नोकरी केली. मात्र तेथे मन न रमल्याने एमआयटी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रूजू झालो. याठिकाणी एक वर्ष काम केल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरू करायचे ठरवले. तसे पाहिले तर मी कधी आमदार होईल याचा स्वप्नात देखील विचार केला नव्हता. माझे वडील कै.भानुदासराव चव्हाण हे छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात अनेक वर्षे सक्रीय कार्यरत होते. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक व तत्कालीन प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष कै.विनायकरावजी पाटील यांचे ते विश्वासू सहकारी होते. पुढे छत्रपती संभाजीनगर कॉंग्रेस कमिटीची विविध पदेही वडिलांनी भूषविली. त्यामुळे घरात सतत राजकारणाची चर्चा चालत असे. असे असतानासुध्दा बारावीपर्यंत मी राजकारणापासून दूर होतो. मात्र 12 वीत असताना कै.वसंतरावजी काळे यांच्याशी संपर्क आला आणि मी चळवळीत आपोआप ओढला गेलो. विद्यार्थ्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी सोडविण्यात सहभागी होऊ लागलो. या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मी जाणीवपूर्वक काम केले. विविध आंदोलने केली. मी इंजिनीअरींगला शिकत असताना माझ्या कामाला अधिक गती आली. मी विद्यार्थी संसदेवर निवडून आलो. विद्यार्थी संसदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थीदशेतील सर्व प्रवास तसाच पुढे चालू राहिला. Read More

Photos

Recent Updated Photos

Videos

Recent Updated Videos

Press

Press Coverage.

Click to play