महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत घेण्यात येणार्‍या परीक्षांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा वाढवण्यात यावी यासाठी मी शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करीत होतो. नागपूर येथे डिसेंबर 2015 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात मी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. तसेच फेब्रुवारी 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पुन्हा स्मरणपत्र देखील दिले होते. या सततच्या पाठपुराव्याचा परिणाम म्हणून अखेर शासनाने 25 एप्रिल 2016 रोजी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 38 वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षे कमाल वय करण्याचा निर्णय घेतला.