शिक्षकांच्या अनुदाना संदर्भात 8 ऑक्टोबर 2020 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री मा.ना.जयंतजी पाटील यांच्या सोबत पदवीधर व शिक्षक आमदारांची बैठक झाली. या बैठकीस मी स्वत: उपस्थित होतो. 14 ऑक्टोबर 2020 रोजीच्या कॅबीनेटमध्ये प्रस्ताव मंजूर करून सदरील प्रश्न निकाली काढला जाईल असा शब्द आदरणीय अजितदादा पवार यांनी आम्हा पदवीधर व शिक्षक आमदारांना दिला होता. आदरणीय दादांनी देखील दिलेला शब्द पूर्ण करत राज्यातील अनुदानासाठी घोषित केलेल्या प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/तुकड्या अतिरिक्त शाखा यांना 20 टक्के तसेच यापूर्वी 20 टक्के अनुदान उपलब्ध करून दिलेल्या प्राथमिक/ माध्यमिक शाळा व तुकड्यांना अतिरिक्त 20 टक्के अनुदान 1 नोव्हेंबर 2020 पासून देण्याचा निर्णय 14 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच भाजप सरकारच्या काळात शिक्षकांच्या अनुदानासंदर्भात लावण्यात आलेल्या जाचक अटी देखील रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे राज्यातील अनुदानास पात्र ठरलेल्या शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे.