कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने 22 मार्चपासून ‘लॉकडाऊन’ करण्याचा निर्णय घेतला. मात्र या ‘लॉकडाऊन’च्या काळात औरंगाबाद शहरातील विद्यार्थी तसेच गोरगरीब गरजू नागरिकांची उपासमार व गैरसोय होऊ नये यासाठी अशा विद्यार्थी व नागरिकांसाठी मी दोन महिने भोजनाची व्यवस्था केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर तसेच औरंगपुरा भागात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक विद्यार्थी ‘लॉकडाऊन’मुळे शहरात अडकून पडले होते. त्यात त्यांच्या ‘मेस बंद’ झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. तसेच शहरातील रेल्वे स्टेशन परिसर, अयोध्या नगरी, मोंढा नाका, कोकणवाडी, हमालवाडा आदी भागात राहणार्या गोर गरीब गरजू नागरिकांना ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा नियम पाळत दोन महिने 1200 विद्यार्थी व एक हजार नागरिकांना मोफत भोजन दिले.