आदरणीय शरद पवार साहेबांसोबत विविध शैक्षणिक प्रश्नावर बैठक

आदरणीय शरद पवार साहेबांनी 23 जानेवारी 2020 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे उच्च शिक्षण खात्यातील प्रश्नांसंदर्भात बैठक बोलावली होती. उच्च शिक्षण मंत्री मा.ना.उदयजी सामंत, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांच्यासह मी देखील या बैठकीस उपस्थित होतो. सदरील बैठकीत प्राचार्य, बिगर नेट/सेट धारकसह प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांबरोबरच विद्यापीठ कायदा, रूसाचा निधी वितरण, ग्रंथालयांची दर्जा वाढ…

READ MORE

गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट संधी

राज्यातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक विजेत्या गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट संधी मिळण्याचा मार्ग अधिक सोपा व्हावा तसेच खेळाडूंच्या गुणवत्तेचा उपयोग नवे दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी व्हावा, यासाठी राज्याच्या क्रीडा धोरणात आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली दि.3 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त…

READ MORE

महाराष्ट्र लोकसेवा आयोग – उमेदवारांची वयोमर्यादा वाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत घेण्यात येणार्‍या परीक्षांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा वाढवण्यात यावी यासाठी मी शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करीत होतो. नागपूर येथे डिसेंबर 2015 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात मी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. तसेच फेब्रुवारी 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पुन्हा स्मरणपत्र देखील दिले होते. या सततच्या पाठपुराव्याचा परिणाम म्हणून अखेर शासनाने 25 एप्रिल 2016…

READ MORE

सन 2008 पासून मी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतोय. मराठवाड्यातील पदवीधर बंधू-भगिनींनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर जी जबाबदारी सोपवली ती मी यशस्वीपणे पेलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आलोय. मागील 12 वर्षांपासून आमदार असलो तरी माझा आतापर्यंतचा प्रवास, कौटुंबिक पार्श्वभूमी आपल्या समोर ठेवणे मला गरजेचे वाटते... माझे प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण औरंगाबादच्या सरस्वती भुवन शाळेत तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद येथून 1982 साली मी बी.ई.मॅकेनिकल ही पदवी संपादन केली. त्यानंतर सहा वर्ष विविध कंपन्यात नोकरी केली. मात्र तेथे मन न रमल्याने एमआयटी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रूजू झालो. याठिकाणी एक वर्ष काम केल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरू करायचे ठरवले. तसे पाहिले तर मी कधी आमदार होईल याचा स्वप्नात देखील विचार केला नव्हता. माझे वडील कै.भानुदासराव चव्हाण हे औरंगाबादच्या राजकारणात अनेक वर्षे सक्रीय कार्यरत होते. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक व तत्कालीन प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष कै.विनायकरावजी पाटील यांचे ते विश्वासू सहकारी होते. पुढे औरंगाबाद कॉंग्रेस कमिटीची विविध पदेही वडिलांनी भूषविली. त्यामुळे घरात सतत राजकारणाची चर्चा चालत असे. असे असतानासुध्दा बारावीपर्यंत मी राजकारणापासून दूर होतो. मात्र 12 वीत असताना कै.वसंतरावजी काळे यांच्याशी संपर्क आला आणि मी चळवळीत आपोआप ओढला गेलो. विद्यार्थ्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी सोडविण्यात सहभागी होऊ लागलो. या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मी जाणीवपूर्वक काम केले. विविध आंदोलने केली. मी इंजिनीअरींगला शिकत असताना माझ्या कामाला अधिक गती आली. मी विद्यार्थी संसदेवर निवडून आलो. विद्यार्थी संसदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थीदशेतील सर्व प्रवास तसाच पुढे चालू राहिला.   

Read More

Photos

Recent Updated Photos

Videos

Recent Updated Videos

Press

Press Coverage.

Click to play