मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट वाक्कौशल्य दिसून येते. केवळ व्यासपीठा अभावी या विद्यार्थ्यांना आपले विचार मांडता येत नव्हते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने मागील नऊवर्षांपासून आदरणीय खा.शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ‘मराठवाड्याचा युवावक्ता’ ही आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येते. सर्वप्रथम स्पर्धेच्या जिल्हानिहाय फेर्‍या घेण्यात येतात. त्यातून प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकप्राप्त करणार्‍या स्पर्धकांची ‘महाअंतिमफेरी’ औरंगाबाद येथे घेण्यात येते. व त्यातून प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्‍तकरणार्‍या स्पर्धकांना अनुक्रमे रोख रूपये 21000, 15000 व 10000, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. विशेष म्हणजे ही स्पर्धा नि:शुल्क असते. यास्पर्धेच्या महाअंतिमफेरीच्या पोरितोषिक वितरणासाठी तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील (आबा), खा.बापुसाहेब काळदाते, खा.सुप्रियाताई सुळे, मा.ना.राजेशजी टोपे, मा.ना. धनंजयजी मुंडे, सुप्रसिध्द लेखक अरविंद जगताप, सुप्रसिध्द वक्ते आ.अमोलजी मिटकरी यांची विशेष उपस्थिती लाभली आहे.