राज्यात वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी गुणवत्ता असूनही मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना 70:30 या फॉर्म्युल्यानुसार प्रादेशिक आरक्षणाला तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा वैद्यकीय प्रवेशाचा 70:30 हा फॉर्म्युला त्वरित रद्द करावा अशी आग्रही मागणी मी शासनस्तरावर वेळोवेळी करत आलो. यासंदर्भात 2 जुलै 2019 रोजी लक्षवेधी उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. संबंधित मंत्री महोदय, संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. परंतु तत्कालीन सरकारने आमची मागणी मान्य केली नाही. मात्र महाविकास आघाडी सरकारने 8 सप्टेंबर 2020 रोजी वैद्यकीय प्रवेशासाठीचा 70:30 फॉर्म्युला रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर केला. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरेे, उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री मा.ना.अमीतजी देशमुख यांचे आभार मानले. एक जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान वाटते.