कोरोना व्हायरसने घातलेल्या विध्वंसक धुमाकुळीच्या पार्श्वभूमीवर विषाणुविषयक संशोधन व निदान करणारे नॅशनल व्हायरॉलॉजी सेंटर मराठवाड्यात नव्हते. संशयित रूग्णांचे स्वॅबचे नमुने पुणे, मुंबई, नागपूर आदी ठिकाणी कार्यान्वित असलेल्या व्हायरॉलॉजी सेंटरवरून तपासून आणावे लागत असे. कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे, मुंबई, नागपूरच्या धर्तीवर मराठवाड्यात देखील हे सेंटर त्वरित सुरू करावे अशी मागणी मी 18 मार्च 2020 रोजी सार्वजनिक आरोग्य मंत्री मा.ना.राजेशजी टोपे यांच्याकडे केली होती. या प्रयत्नाला देखील यश आले. आज मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात कोरोना संशयित रूग्णांचे स्वॅब घेण्यासाठी टेस्टिंग लॅब कार्यान्वित झालेल्या आहेत. त्यामुळे उपचार करणे सोपे झाले.