कोटा (राजस्थान) येथे शिक्षणासाठी गेलेले राज्यातील हजारो विद्यार्थी कोरोनातील ‘लॉकडाऊन’मध्ये त्याठिकाणी अडकून पडले होते. शासनाने या विद्यार्थ्यांना परत आपल्या राज्यात आणण्याची व्यवस्था करावी अशी मागणी मी 18 एप्रिल 2020 रोजी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार, गृहमंत्री मा.ना.अनिलजी देशमुख यांच्याकडे केली. शिवाय मा.अजितदादांशी यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला. अखेर शासनस्तरावर तातडीने निर्णय घेऊन कोटा येथे विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्यातील 100 बसेस रवाना करण्यात आल्या. परिणामी राज्यातील सर्व विद्यार्थी सुखरूप आपापल्या घरी परतले.