राज्यात विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास-वर्गाच्या मुलांसाठीच्या उच्च माध्यमिक आश्रमशाळां-मधील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करावी यासाठी मी शासनस्तरावर वेळावेळी पाठपुरावा करीत होतो. अखेर शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने 10 जून 2020 रोजी सदरील आश्रमशाळांमधील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय घेतला.