राज्यातील वरिष्ठ मविद्यालयातील तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी यासाठी 21 डिसेंबर 2017 रोजी मी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. तासिका तत्वावर काम करणार्या प्राध्यापकांना प्रतीतास केवळ 250 रू. मानधन मिळत होते. विद्यादानाचे पवित्र काम करणाऱ्या प्राध्यापकांना मिळणारे तुटपुंजे मानधन लक्षात घेता त्यात वाढ व्हावी, यासाठी मी वेळोवेळी शासनस्तरावर पाठपुरावा केला. अखेर शासनाने 14 नोव्हेंबर 2018 रोजी तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला.