अकृषी विद्यापीठामधील शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी सातवा वेतन लागू करावा यासाठी राज्यभर लेखणी बंद आंदोलन केले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची 28 सप्टेंबर 2020 रोजी मी विद्यापीठात भेट घेऊन यासंदर्भात आपण स्वत: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.उदयजी सामंत यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मंत्री महोदयांसोबत झालेल्या बैठकीत सदरील प्रश्न त्वरीत निकाली काढावा अशी आग्रही मागणी मी केली होती. मंत्री महोदयांनी देखील आमच्या मागणीची दखल घेतली. व 14 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या मंत्री मंडळाच्या राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला. अखेर राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचा सातवा वेतन आयोग लागू करण्याचा महत्वपूर्ण प्रश्न मार्गी लावण्यात यश आले