महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत, पुरोगामी चळवळीचे मार्गदर्शक, प्राच्यविद्यापंडित डॉ.आ.ह.साळुंखे यांचा 20 डिसेंबर 2018 रोजी देवगिरी महाविद्यालयात अमृतमहोत्सवी गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. स्वराज इंडियाचे अध्यक्ष डॉ.योगेंद्रजी यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या गौरव समारंभास औरंगाबाद शहरासह मराठवाड्यातील श्रोत्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.