मराठवाड्यातील लघुउद्योजकांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात मी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत आलो आहे. लघुउद्योजकांच्या प्रश्नांसदर्भात 27 मार्च 2015 रोजी मी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. शेंद्रा व वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये लघुउद्योजकांना भूखंड उपलब्ध करून द्यावे अशी आग्रही मागणीही मी सभागृहात केली होती.