मराठवाड्यातील तालुका क्रीडा संकुलांच्या झालेल्या दुरावस्थेबाबत 17 जुलै 2018 रोजी विधान परिषदेत लक्षवेधी उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेेधले. मराठवाड्यातील कोणत्याच तालुका क्रीडा संकुलाचे काम समाधानकारक नसून बहुतांश तालुका क्रीडा संकुलांना शासकीय भूखंड उपलब्ध झालेले नाहीत. ज्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुलांचे बांधकाम सुरू आहे ते निकृष्ट दर्जाचे होत आहे. क्रीडा संकुलांना विविध खेळांची मैदाने, क्रीडा साहित्य, संकुलातील पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, विद्युतीकरण, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत या सुविधांसाठी फक्त एक कोटी रूपये निधी देण्यात येतो. मात्र ही रक्कम अत्यंत कमी असून या रकमेतून क्रीडा साहित्य देखील खरेदी करता येत नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तालुका क्रीडा संकुलांच्या ठिकाणी क्रीडा प्रशिक्षक नाही. त्यामुळे चांगले खेळाडू निर्माण कसे होणार? असे प्रश्न सभागृहात उपस्थित करून चर्चा घडवून आणली.