प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापकांचे अनेक प्रश्न शासनस्तरावर प्रलंबित होते. त्यामुळे सदरील प्रश्न निकाली काढावे यासाठी मी वेळोवेळी पाठपुरावा करीत आलो आहे. यासाठी विधान परिषदेत शिक्षकांच्या प्रश्नांवर वाचा फोडली. अनेक वेळा विधान भवनासमोर धरणे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. तसेच शिक्षकांच्या विविध संघटनांच्यावतीने शिक्षकांच्या न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी ज्या ज्या वेळी आंदोलने झाली त्या सर्व आंदोलनात सहभागी होत मी जाहीर पाठिंबा दिला. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची शासनाने दखल घ्यावी यासाठी 30 मे 2016 रोजी तत्कालीन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची भेट घेतली. शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविण्यात यश आले तर काही प्रश्न प्रलंबित आहेत. यासाठी अजूनही शासनस्तरावर माझा वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे.