मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीशभाऊ चव्हाण यांच्यावतीने आदरणीय शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी मराठवाड्याचा युवावक्ता ही आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते. आदरणीय सतीशभाऊंनी या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हक्काचे आणि प्रतिष्ठेचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

माझ्यासाठी आनंदाची गोष्ट अशी की, 2015 मध्ये झालेल्या या स्पर्धेच्या प्राथमिक व अंतिम फेरीत मी प्रथम क्रमांक मिळवत मराठवाड्याचा युवावक्ता होण्याचा बहुमान मिळवला. विशेष म्हणजे युवावक्ता ठरलेल्या स्पर्धकाचा पुढील वर्षभर ज्या ज्या ठिकाणी वक्तृत्व, वाद-विवाद अशा स्पर्धा करायला जाईल त्याचा सर्व खर्च सतीशभाऊ स्वत: करतात. याचा सर्वाधिक फायदा मी घेतलाय असं म्हटलं तर  वावगं ठरणार नाही. आज या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक वक्त्यांना स्वत:ची एक वेगळी ओळख मिळाली आहे. अनेक जण वक्तृत्वाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात आपले नशीब आजमावत आहेत. मी स्वत: आज एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर कार्यरत आहे. माझ्या या वाटचालीत आदरणीय सतीशभाऊ चव्हाण यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले आहे.

कु. निकिता पाटील,

एबीपी माझा, मुंबई