डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने 2017-18 या शैक्षणिक वर्षाची पदव्युत्तर प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाईन राबवली होती. मात्र ही प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड व शिक्षणापासून वंचित ठेवणारी होती. तत्कालीन कुलगुरुंची भेट घेऊन मी त्यांना सदरील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांच्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या. तसेच विद्यापीठाच्या विविध विभागात व विविध महाविद्यालयात रिक्त जागेच्या प्रवेशाचा अधिकार संबंधित विभाग प्रमुख व महाविद्यालयांना देण्यात यावा अशी आग्रही मागणी केली. कुलगुरूंनी माझ्या मागणीची दखल घेत तसे परिपत्रक प्रसिध्द केले.