जालना येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील वसतिगृहात विद्यार्थ्यांना कुठल्याच सोई सुविधा मिळत नसल्याचे तेथील विद्यार्थ्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात 5 एप्रिल 2016 रोजी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्र्यांनी यासंदर्भात त्वरित निर्णय घेतला जाईल असे सांगून, आपण स्वत: आमदार सतीश चव्हाण यांच्याबरोबर लवकरच वसतिगृहाची पाहणी करू असे सांगितले. त्यानुसार तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री व मी 10 नोव्हेंबर 2016 रोजी स्वत: जालना येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयास भेट देऊन तेथील वसतिगृहाची झाडाझडती घेतली. व संबंधित अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न त्वरित सोडवण्याचे आदेश दिले.