कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वत:चा जीव धोक्यात घालून रूग्णांना आवश्यक ती सेवा देणाऱ्या बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टरांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी मी 23 मे 2020 रोजी मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री मा.ना. राजेशजी टोपे यांच्याकडे केली होती. राज्य शासनाने देखील माझ्या मागणीची तात्काळ दखल घेत 29 मे 2020 रोजी शासन निर्णयाव्दारे बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात 20 हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे बंधपत्रित डॉक्टरांचे मनोधैर्य वाढण्यास नक्कीच मदत झाली. शिवाय या निर्णयामुळे आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांना बंधपत्रित डॉक्टरांकडून वेळेवर उपचार होण्यास मदत होणार आहे.