सन 2014 मध्ये झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासह देशात पाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) संस्था उभारणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. औद्योगिक विकास, उपलब्ध जागा, येऊ घातलेला ‘डीएमआयसी’ प्रकल्प, राज्यातील मध्यवर्ती ठिकाण पाहता केंद्राने महाराष्ट्रासाठी मान्य केलेले हे ‘आयआयएम’ औरंगाबादलाच झाले पाहिजे, अशी आग्रही भूमिका मी घेतली. तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री […]
सुशिक्षित बेरोजगार पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची यादी अद्यायावत करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी मी 27 सप्टेंबर 2016 रोजी तत्कालीन कामगार, कौशल्य विकास मंत्र्यांकडे केली होती. माझ्या मागणीची दखल घेत शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या आयुक्तांनी परिपत्रक प्रसिध्द करून यादी अद्यायावत करण्यास मुदतवाढ दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विना-अनुदानित महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची शुल्कवाढ केली होती. ही शुल्कवाढ त्वरित रद्द करावी या मागणीसाठी मी जुलै 2015 मध्ये विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरुंची भेट घेतली. मराठवाड्यात तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. वाढीव शुल्कांमुळे विद्यार्थ्यांवर आर्थिक बोजा पडून ते शिक्षणापासून वंचित राहू शकतात, त्यामुळे शुल्कवाढ त्वरित रद्द करावी, अशी मागणी केली होती. कुलगुरूंनी माझ्या […]
मान्यताप्राप्त व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीसाठी पालकांची उत्पन्न मर्यादा वाढविण्यात यावी अशी मागणी मी शासनस्तरावर वेळोवेळी केली. यासंदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित करून या प्रश्नाला वाचा फोडली. अखेर शासनाने 31 मार्च 2018 रोजी शासन निर्णयाव्दारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण […]
डिसेंबर 2016 मध्ये विधान परिषदेत औचित्याच्या मुद्याव्दारे पोलिस उपनिरीक्षक पदासाठी खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा वाढविण्यात यावी अशी मागणी माझ्यासह तत्कालीन विरोधी पक्षनेते मा.धनंजयजी मुंडे, तत्कालीन आ.अमरसिंह पंडित यांनी सभागृहात केली होती. आमच्या मागणीची दखल घेत तत्कालीन महसूल मंत्र्यांनी पोलिस उपनिरीक्षक पदासाठी खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा 31 व मागासवर्गीय उमेदवाराची वयोमर्यादा 34 वर्ष ग्राह्य धरण्यात येणार असल्याची घोषणा […]
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेली पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) माध्यमातून अनुसूचित जातीच्या एम.फिल. व पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. बार्टीच्यावतीने 2018 या शैक्षणिक वर्षात 408 विद्यार्थ्यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी (फेलोशिप) निवड करण्यात आली होती. त्यापैकी 105 विद्यार्थ्यांना बार्टीने 3 मार्च 2020 रोजी फेलोशिप […]
आदरणीय शरद पवार साहेबांनी 23 जानेवारी 2020 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे उच्च शिक्षण खात्यातील प्रश्नांसंदर्भात बैठक बोलावली होती. उच्च शिक्षण मंत्री मा.ना.उदयजी सामंत, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांच्यासह मी देखील या बैठकीस उपस्थित होतो. सदरील बैठकीत प्राचार्य, बिगर नेट/सेट धारकसह प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांबरोबरच विद्यापीठ कायदा, रूसाचा निधी वितरण, ग्रंथालयांची दर्जा वाढ […]
राज्यातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक विजेत्या गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट संधी मिळण्याचा मार्ग अधिक सोपा व्हावा तसेच खेळाडूंच्या गुणवत्तेचा उपयोग नवे दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी व्हावा, यासाठी राज्याच्या क्रीडा धोरणात आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली दि.3 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त […]
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत घेण्यात येणार्या परीक्षांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा वाढवण्यात यावी यासाठी मी शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करीत होतो. नागपूर येथे डिसेंबर 2015 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात मी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. तसेच फेब्रुवारी 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पुन्हा स्मरणपत्र देखील दिले होते. या सततच्या पाठपुराव्याचा परिणाम म्हणून अखेर शासनाने 25 एप्रिल 2016 […]