उस्मानाबाद येथील विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी भूखंडापोटी द्यावे लागणारे सेवा शुल्क रद्द केले

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रासाठी अधिग्रहित केलेल्या भूखंडापोटी एमआयडीसी आकारत असलेले सेवा शुल्क रद्द करण्यासंदर्भात मी शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करीत होतो. यासंदर्भात 25 ऑगस्ट 2020 रोजी उद्योगमंत्री मा.ना.सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.उदय सामंत यांच्यासह मी देखील उपस्थित होतो. सदरील सेवा शुल्क […]

Read More ⇾

वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासाठी समिती..

वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या सातव्या वेतन आयोगातील त्रुटी, प्राध्यापक भरती संदर्भातील बिंदूनामावली, प्राध्यापकांचे पगार वेळेवर न होणे आदी प्रश्नांसंदर्भात विधान परिषदेत 21 जून 2019 रोजी लक्षवेधीव्दारे सभागृहाचे लक्ष वेधले. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या शासन निर्णयात अनेक विसंगती निर्माण झालेल्या आहेत. तसेच प्राध्यापक भरती संदर्भातील बिंदूनामावलीचा मुद्दा उपस्थित करून शासनाने प्राध्यापक भरतीची जी पध्दत अवलंबली आहे […]

Read More ⇾

राज्यातील वरिष्ठ मविद्यालयातील तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ..

राज्यातील वरिष्ठ मविद्यालयातील तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी यासाठी 21 डिसेंबर 2017 रोजी मी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. तासिका तत्वावर काम करणार्या प्राध्यापकांना प्रतीतास केवळ 250 रू. मानधन मिळत होते. विद्यादानाचे पवित्र काम करणाऱ्या प्राध्यापकांना मिळणारे तुटपुंजे मानधन लक्षात घेता त्यात वाढ व्हावी, यासाठी मी वेळोवेळी शासनस्तरावर पाठपुरावा केला. […]

Read More ⇾

कोटा (राजस्थान) येथे ‘लॉकडाऊन’मध्ये अडकलेल्या राज्यातील हजारो विध्यार्थ्यांना सुखरूप आणले

कोटा (राजस्थान) येथे शिक्षणासाठी गेलेले राज्यातील हजारो विद्यार्थी कोरोनातील ‘लॉकडाऊन’मध्ये त्याठिकाणी अडकून पडले होते. शासनाने या विद्यार्थ्यांना परत आपल्या राज्यात आणण्याची व्यवस्था करावी अशी मागणी मी 18 एप्रिल 2020 रोजी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार, गृहमंत्री मा.ना.अनिलजी देशमुख यांच्याकडे केली. शिवाय मा.अजितदादांशी यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला. अखेर शासनस्तरावर तातडीने निर्णय घेऊन कोटा येथे […]

Read More ⇾

समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची निवासासह भोजनाची नियमीत व्यवस्था केली

समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा संपली की लगेच वसतिगृह सोडावे लागते. मात्र इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी सीईटी, नीट, जेईई या प्रवेश परीक्षा देत असतील तर संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा देईपर्यंत वसतिगृहात राहू द्यावे मात्र त्या विद्यार्थ्यांना भोजनाची सुविधा देण्यात येऊ नये असे पत्रकच राज्याच्या समाज कल्याण आयुक्तालयाने मार्च 2018 मध्ये […]

Read More ⇾

औरंगाबादेत जेईई-ऍडव्हान्स परीक्षा केंद्र सुरू केले..

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्यावतीने अभियांत्रिकीच्या नामांकित संस्थांमध्ये आयआयटी तसेच एनआयटीसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र महाराष्ट्रात मुंबई, पुणे व नागपूर या तीन ठिकाणीच जेईई-ऍडव्हान्स ही परीक्षा घेण्यात येत होती. त्यामुळे या परीक्षेसाठी औरंगाबादेतही केंद्र सुरू करावे अशी मागणी मी 2016 मध्ये तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री, तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्याकडे […]

Read More ⇾

औरंगाबादसह नांदेड, लातूर, बीड याठिकाणी नीटचे परीक्षा केंद्र मंजूर केले.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशभरात नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी मराठवाड्यात औरंगाबादसह नांदेड, लातूर, बीड याठिकाणी देखील परीक्षा केंद्र देण्यात यावे, यासाठी मी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत होतो. अखेर माझ्या या प्रयत्नाला यश आले. ‘सीबीएसई’ बोर्डाने नांदेड, लातूर व बीड जिल्ह्याला नीटचे परीक्षा केंद्र मंजूर केले.

Read More ⇾

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या भावास कायम स्वरूपी नोकरी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कानडगाव जि.औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे या तरूणाने आपले बलिदान दिले. 26 जुलै 2018 रोजी मी कानडगाव येथे शिंदे कुटुंबिंयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच काकासाहेब शिंदे यांचे भाऊ अविनाश शिंदे यांना शैक्षणिक पात्रतेनुसार आमच्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संस्थेत कायम स्वरूपी लिपीक पदाची नोकरी दिली. अविनाश शिंदे हे ऑगस्ट 2018 पासून […]

Read More ⇾

औरंगाबाद, बीड जिल्ह्यात ‘नोकरी महोत्सव’ आयोजन

नॅशनल करिअर सर्विस श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ व भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद, बीड जिल्ह्यात ‘नोकरी महोत्सव’ आयोजित करण्यात आले होते. या नोकरी महोत्सवात अनेक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. असंख्य तरूणांना या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून रोजगार मिळाला व त्यांचे […]

Read More ⇾

“स्पा” ही आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था औरंगाबादेत स्थापन करण्यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा

स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर (स्पा) ही आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था औरंगाबाद येथे स्थापन करण्यासंदर्भात शासन स्तरावर तातडीने कार्यवाही करावी, यासाठी मी शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करीत आहे. 21 जून 2018 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ‘स्पा‘ औरंगाबादेत सुरू करण्यासंदर्भात शासन स्तरावर संथ गतीने कार्यवाही होत असल्याचे सांगितले. आपण स्वतः औरंगाबादला स्कूल ऑफ प्लॅनिंग अँडआर्किटेक्चर (स्पा) देण्याची […]

Read More ⇾