आश्रमशाळांमधील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय

राज्यात विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास-वर्गाच्या मुलांसाठीच्या उच्च माध्यमिक आश्रमशाळां-मधील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करावी यासाठी मी शासनस्तरावर वेळावेळी पाठपुरावा करीत होतो. अखेर शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने 10 जून 2020 रोजी सदरील आश्रमशाळांमधील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय घेतला.

Read More ⇾

पाठपुरावा – प्राथमिक, माध्यमिक व उच्च मा. स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापकांचे शासनस्तरावर प्रलंबित प्रश्न..

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापकांचे अनेक प्रश्न शासनस्तरावर प्रलंबित होते. त्यामुळे सदरील प्रश्न निकाली काढावे यासाठी मी वेळोवेळी पाठपुरावा करीत आलो आहे. यासाठी विधान परिषदेत शिक्षकांच्या प्रश्नांवर वाचा फोडली. अनेक वेळा विधान भवनासमोर धरणे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. तसेच शिक्षकांच्या विविध संघटनांच्यावतीने शिक्षकांच्या न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी ज्या ज्या वेळी आंदोलने झाली […]

Read More ⇾

आश्रम शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचा पगार समायोजन होईपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश..

राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या आश्रम शाळेतील शिक्षक अतिरिक्त झाले होते. त्यामुळे शासनाने अतिरिक्त शिक्षकांचा पगार बंद केला होता. सदरील शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत त्यांचा पगार सुरू ठेवावा अशी मागणी मी तत्कालीन सामाजिक न्यायमंत्र्यांकडे केली होती. यासंदर्भात शासनाने 17 ऑक्टोबर 2016 रोजी शुध्दीपत्रक प्रसिध्द करून सदरील शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत पगार सुरू ठेवण्याचे आदेश दिले. त्याचा लाभ […]

Read More ⇾

राज्यातील अनुदानास पात्र म्हणून घोषित केलेल्या प्राथमिक/माध्यमिकच्या 1628 शाळा व 2452 वर्ग तुकड्यांना 20 टक्के प्रमाणे वेतन अनुदान देण्यासाठी 71 कोटी 50 लाखांची तरतूद

विधानमंडळाच्या नागपूर येथील 2016 च्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शासनाने पुरवणी मागण्या मांडल्या. त्यामध्ये राज्यातील अनुदानास पात्र म्हणून घोषित केलेल्या प्राथमिक/माध्यमिकच्या 1628 शाळा व 2452 वर्ग तुकड्यांना 20 टक्के प्रमाणे वेतन अनुदान देण्यासाठी 71 कोटी 50 लाखांची तरतूद केली. शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे अखेर माझ्या या मागणीला यश आले.

Read More ⇾

11 वी व 12 वी भारतीय संगीत विषय मूल्यांकन पूर्वीप्रमाणेच करण्याचा निर्णय..

भारतीय संगीत हा विषय इयत्ता 11 वी व 12 वी साठी मागील अनेक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात 200 गुणांसाठी अभ्यासला जायचा. शालेय शिक्षण विभागाने सुधारित विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजनेखाली शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून 200 गुणांचा संगीत विषय 100 गुणांवर आणला होता. हा निर्णय संगीत शिकणारे विद्यार्थी व शिक्षकांवर अन्यायकारक ठरणारा होता. त्यामुळे राज्यातील सर्व […]

Read More ⇾

शालेय शिक्षण विभागाने अनुदानासाठी घोषित केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना 20 टक्के अनुदान मंजूर..

24 फेब्रुवारी 2020 रोजी विधान मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शासनाने पुरवणी मागण्या सादर केल्या. यामध्ये शालेय शिक्षण विभागाने अनुदानासाठी घोषित केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना 20 टक्के अनुदान देण्यासाठी 106 कोटी 74 लाख 72 हजार एवढ्या रकमेच्या खर्चास पूरक मागणीव्दारे वित्त विभागाकडे मागणी केली होती. त्यास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री […]

Read More ⇾

शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात पाठपुरावा..

शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात 11 ऑगस्ट 2020 रोजी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री मा.ना.वर्षाताई गायकवाड यांच्या दालनात शिक्षक व पदवीधर आमदारांची बैठक झाली. या बैठकीस उपस्थित राहून कोरोनाच्या संकट काळात शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न त्वरित मार्गी लावून राज्यातील शिक्षकांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी मी या बैठकीत केली. शालेय शिक्षण विभागाने अनुदानासाठी घोषित केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च […]

Read More ⇾

‘लॉकडाऊन’मध्ये जिल्हास्तरावर 12 वीच्या उत्तर पत्रिका जमा करण्याची व्यवस्था करून दिली

मे 2020 मध्ये राज्यात बारावीच्या उत्तर पत्रिका जमा करण्याचे काम महाराष्ट्र राज्य माध्य.व उच्च माध्य.शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागीय मंडळाकडून सुरू होते. औरंगाबाद शहर त्यावेळी ‘रेड झोन’मध्ये असल्याने जालना, परभणी, बीड, हिंगोली याठिकाणाहून उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी येणाऱ्या शिक्षकांना व नंतर त्यांच्या कुटुंबासाठी हे धोक्याचे ठरू शकते. त्यातच ‘लॉकडाऊन’ व संचारबंदी असल्याने इतर जिल्ह्यातील शिक्षकांना औरंगाबादला येण्यासाठी […]

Read More ⇾

कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित काम, मानधनात भरीव वाढ..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास 2 जानेवारी 2020 रोजी सदिच्छा भेट देऊन विद्यापीठात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांच्या पदोन्नती, कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित काम देण्यासह इतर समस्या सोडविण्याची मागणी कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्याकडे केली. तसेच विद्यापीठातील कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी केली. विद्यापीठाने देखील माझ्या मागणीची दखल घेत कमवा व […]

Read More ⇾

आर्थिक भुर्दंड टाकणारी पदव्युत्तर प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया रद्द केली..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने 2017-18 या शैक्षणिक वर्षाची पदव्युत्तर प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाईन राबवली होती. मात्र ही प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड व शिक्षणापासून वंचित ठेवणारी होती. तत्कालीन कुलगुरुंची भेट घेऊन मी त्यांना सदरील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांच्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या. तसेच विद्यापीठाच्या विविध विभागात व विविध महाविद्यालयात रिक्त जागेच्या प्रवेशाचा अधिकार संबंधित विभाग प्रमुख व […]

Read More ⇾