डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास 2 जानेवारी 2020 रोजी सदिच्छा भेट देऊन विद्यापीठात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांच्या पदोन्नती, कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित काम देण्यासह इतर समस्या सोडविण्याची मागणी कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्याकडे केली. तसेच विद्यापीठातील कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी केली. विद्यापीठाने देखील माझ्या मागणीची दखल घेत कमवा व […]
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने 2017-18 या शैक्षणिक वर्षाची पदव्युत्तर प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाईन राबवली होती. मात्र ही प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड व शिक्षणापासून वंचित ठेवणारी होती. तत्कालीन कुलगुरुंची भेट घेऊन मी त्यांना सदरील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांच्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या. तसेच विद्यापीठाच्या विविध विभागात व विविध महाविद्यालयात रिक्त जागेच्या प्रवेशाचा अधिकार संबंधित विभाग प्रमुख व […]
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रासाठी अधिग्रहित केलेल्या भूखंडापोटी एमआयडीसी आकारत असलेले सेवा शुल्क रद्द करण्यासंदर्भात मी शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करीत होतो. यासंदर्भात 25 ऑगस्ट 2020 रोजी उद्योगमंत्री मा.ना.सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.उदय सामंत यांच्यासह मी देखील उपस्थित होतो. सदरील सेवा शुल्क […]
वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या सातव्या वेतन आयोगातील त्रुटी, प्राध्यापक भरती संदर्भातील बिंदूनामावली, प्राध्यापकांचे पगार वेळेवर न होणे आदी प्रश्नांसंदर्भात विधान परिषदेत 21 जून 2019 रोजी लक्षवेधीव्दारे सभागृहाचे लक्ष वेधले. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या शासन निर्णयात अनेक विसंगती निर्माण झालेल्या आहेत. तसेच प्राध्यापक भरती संदर्भातील बिंदूनामावलीचा मुद्दा उपस्थित करून शासनाने प्राध्यापक भरतीची जी पध्दत अवलंबली आहे […]
राज्यातील वरिष्ठ मविद्यालयातील तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी यासाठी 21 डिसेंबर 2017 रोजी मी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. तासिका तत्वावर काम करणार्या प्राध्यापकांना प्रतीतास केवळ 250 रू. मानधन मिळत होते. विद्यादानाचे पवित्र काम करणाऱ्या प्राध्यापकांना मिळणारे तुटपुंजे मानधन लक्षात घेता त्यात वाढ व्हावी, यासाठी मी वेळोवेळी शासनस्तरावर पाठपुरावा केला. […]