राज्यात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी प्रादेशिक आरक्षणाचा मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा ७०:३० फॉर्म्युला रद्द करण्यासाठीआ. सतीश चव्हाण यांनी शासनस्तरावर वेळोवेळी केलेल्या मागणीला यश. महाविकास आघाडी सरकारने ८ सप्टेंबर २०२० रोजी हा फॉर्म्युला रद्द केला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या परीक्षांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा वाढविण्यासाठी आ. सतीश चव्हाण यांच्या पाठपूराव्याला यश. शासनाने २५ एप्रिल २०१६ रोजी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३८ वर्षे, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्षे कमाल वय करण्याचा निर्णय घेतला.
राज्य सरकारच्या विविध पद भरतीच्या परीक्षा ‘महापरीक्षा पोर्टल’मध्ये अनेक गैरप्रकार होत असल्याचे समोर आल्यानंतर ते त्वरित बंद करण्याच्या आ. सतीश चव्हाण यांच्या मागणीची दखल घेत, शासनाने १७ ऑगस्ट २०२० रोजी शासन निर्णयाव्दारे महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतला.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नॅशनल इलिजबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षेसाठी मराठवाड्यात औरंगाबादसह नांदेड, लातूर, बीड याठीकाणी परीक्षा केंद्र सुरु करण्यासाठी आ. सतीश चव्हाण यांनी केलेल्या पाठपूराव्याला यश.
औरंगाबादेत विधी विद्यापीठ सुरु करण्यासाठी आ. सतीश चव्हाण यांनी पाठपूरावा, आंदोलने केली. अखेर राज्य मंत्रिमंडळाने विधी विद्यापीठाच्या स्थापनेचा निर्णय घेतला व औरंगाबादेत विधी विद्यापीठ सुरु झाले.
मागील नऊ वर्षांपासून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘मराठवाड्याचा युवा वक्ता’ या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मराठवाड्यात विविध ठिकाणी ‘वेध भविष्याचा’ करिअर मार्गदर्शन मेळाव्यांचे आयोजन.
मराठवाड्यात विविध ठिकाणी नोकरी महोत्सवाचे आयोजन. असंख्य तरुणांना नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध.
हलाखीची आर्थिक स्थिती असलेल्या असंख्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत.
मराठवाड्यातील गोर-गरीब, गरजू रुग्णांना शासन, खासगी, दानशुरांच्या मदतीने गेल्या अनेक वर्षांपासून मोफत आरोग्य सुविधा.
कोरोना महामारीत लॉकडाऊनच्या काळात १२०० विद्यार्थी आणि एक हजार नागरिकांना दोन महिने मोफत भोजन.
कोरोना महामारीत १० हजार गोर-गरीब व गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने ‘मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड १९’ साठी ५१ लाख रुपये, आणि ‘पीएम केअर फंड’ साठी ५१ लाख रुपये असा एक कोटी रुपयांचा निधी दिला.
कोरोना महामारीच्या काळात संकटात सापडलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील चार हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांना आ. सतीश चव्हाण यांनी बायर क्रॉपसायन्स लि. च्या संयुक्त विद्यमाने मोफत बाजरी बियाणे वाटप केले.
रस्त्यांसाठी निधी वापरला
लोकांना गंभीर आजारात मदत
गृह उपयोगी वस्तूसंच वितरित
कुक स्टोव वितरित