प्रतिक्रिया – भास्कर अंबादास काटमोरे

मी सर्वसाधारण कुटुंबातील असून आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. माझा मुलगा युवराज काटमोरे वय 9 वर्षे. तो जन्मत: मुका आणि बहिरा आहे. त्याचा इलाज करण्यासाठी 8 ते 9 लाख रुपये खर्च येणार होता. एवढा मोठा खर्च करण्याचा आम्ही विचारही करु शकत नव्हतो. परंतु आम्हाला माहिती मिळाली की, सतीशभाऊ चव्हाण हे भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठान मार्फत गोर- गरीब […]

प्रतिक्रिया – रवी दिलीप गवळी

मला तोंडाचा कर्करोग झाला होता. माझी परिस्थिती अतिशय गरीब असल्यामुळे मी प्रचंड हताश व निराश झालो होतो. यातच मला माझ्या मित्राने मा.अमरसिंह पंडित साहेबांशी संपर्क करून दिला. भैय्या-साहेबांनी आदरणीय सतीशभाऊ चव्हाण यांच्याशी संपर्क करून दिला आणि माझे नशीबच बदलले. आदरणीय सतीशभाऊंनी मला मुंबई येथे उपचारार्थ पाठविले. कै.भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझ्यावर कर्करोगाची शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात […]

प्रतिक्रिया – गंगाधर अनंतराव गायकवाड

माझी मुलगी जान्हवी वय 5 वर्ष. ती जन्मतः मूक बधिर होती. ती बोलत नव्हती आणि ऐकूही येत नव्हते. मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातील असून मुलीवरील शस्त्रक्रिया करण्या इतपत खर्च करण्याची माझी परिस्थिती नव्हती. माझ्या चिमुकलीचे भविष्य आता अंधारातच राहणार आहे की काय? असं वाटत होते. पण, आदरणीय आ.सतीशभाऊ चव्हाण हे भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठान, औरंगाबाद यांच्या […]

प्रतिक्रिया – पंकज पाटेकर

प्रथमतः आमदार श्री.सतीशभाऊ चव्हाण व मा.आ.अमरसिंह पंडित साहेब यांचे मी शतशः आभार मानतो. मला कर्करोगाचा आजार झाला होता. मी घाबरून न जाता मा.अमरसिंह पंडित यांना आजाराबद्दल कानावर घातले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मा.सतीशभाऊ चव्हाण यांना कल्पना देऊन मला मुंबई येथे उपचारसाठी पाठवले. मा.सतीशभाऊ चव्हाण यांनी कै.भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझ्यावरील कर्करोगाची शस्त्रक्रिया विनामूल्य करून […]

प्रतिक्रिया- उत्तम माणिकराव सावणे

मागील दहा वर्षांपासून माझी पत्नी सौ. कमलाबाई सावने स्पाईनकॉड आजाराने त्रस्त होती. अनेक उपचार आणि प्रयत्न करून शेवटी एका वर्तमानपत्रातील बातमी वाचून परभणी येथील भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानच्या आरोग्य शिबिरात सहभागी झालो. शिबिरातील तज्ज्ञ डॉ. आबू चिनिया यांच्या सल्ल्यानुसार मुंबई येथे शस्त्रक्रिया करण्यासाठी सूचवले. आम्ही शैफी हॉस्पिटल, मुंबई येथे दाखल झाल्यानंतर डॉ. अमीत शर्मा सरांनी या […]

प्रतिक्रिया – देविदास दत्तात्रय कोल्हे

माझा मुलगा ऋषीकेशला जन्मापासूनच हार्टच्या वॉलचा प्रॉब्लेम होता. त्यासाठी फार मोठा खर्च लागत असल्याने तो माझ्या आवाक्याबाहेर होता. आपल्या लेकरावर उपचार करण्यासाठी मला खूप हतबल असल्यासारखे वाटले. यासर्व धावपळीत असताना आ. सतीशभाऊ चव्हाण हे भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य सेवेचे कार्य करतात ह्याची मला माहीती मिळाली. आम्ही मुंबईला आमदार निवासात जाऊन आदरणीय भाऊंची भेट घेतली. […]

प्रतिक्रिया – सौ. लक्ष्मीबाई सखाराम टापरे

मी मेंदूच्या आजाराने त्रस्त होते. मुंबईच्या सैफी हॉस्पिटलमध्ये माझ्यावर या शस्त्रक्रियेसाठी साडेतीन लाख रुपये खर्चाची आवश्यकता होती. मात्र आमची परिस्थिती अतिशय बिकट असल्याने उपचार शक्य नव्हते. समोर साक्षात मृत्यू दिसत होता. पण मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीशभाऊ चव्हाण यांनी माझ्या शस्त्रक्रियेचा आणि त्यासाठी कराव्या लागलेल्या सर्व महागड्या तपासण्यांचा खर्चही केला. सतीशभाऊ म्हणजे जीवदान देणारा भाऊ […]

प्रतिक्रिया – श्रीमती राणी प्रसाद दुधारे

मी एक विधवा असून मला दोन मुलं आहेत. मी आजाराने त्रस्त होते. माझ्यावर दोन महत्वाच्या शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता होती, मात्र आर्थिक स्थिती चांगली नसल्याने मला हे शक्य नव्हते. आदरणीय आ. सतीशभाऊ चव्हाण हे भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य सेवेचे कार्य करतात ह्याची मला माहीती मिळाली आणि आदरणीय भाऊ श्री. शिवाजी महाविद्यालय, परभणी येथे काही कामानिमित्त […]

प्रतिक्रिया – प्रविण साळुंके, मालुंजा

औरंगाबाद शहरात अनेक विद्यार्थी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतात. सोबतच हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारीही करतात. हे सर्व विद्यार्थी मराठवाडा विभागासह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरातून औरंगाबादला आलेले. कोरोनामुळे संपूर्ण भारतभर मार्च महिन्यापासून शंभर टक्के लॉकडाऊन होता. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे जवळचे राशन, पैसे संपले होते. अडचणी येतात पण ही अडचण फारच अनपेक्षित होती. अशा वेळी काय करावे? […]

प्रतिक्रिया – कु. निकिता पाटील

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीशभाऊ चव्हाण यांच्यावतीने आदरणीय शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी मराठवाड्याचा युवावक्ता ही आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते. आदरणीय सतीशभाऊंनी या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हक्काचे आणि प्रतिष्ठेचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. माझ्यासाठी आनंदाची गोष्ट अशी की, 2015 मध्ये झालेल्या या स्पर्धेच्या प्राथमिक व अंतिम फेरीत मी प्रथम क्रमांक मिळवत […]