24 फेब्रुवारी 2020 रोजी विधान मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शासनाने पुरवणी मागण्या सादर केल्या. यामध्ये शालेय शिक्षण विभागाने अनुदानासाठी घोषित केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना 20 टक्के अनुदान देण्यासाठी 106 कोटी 74 लाख 72 हजार एवढ्या रकमेच्या खर्चास पूरक मागणीव्दारे वित्त विभागाकडे मागणी केली होती. त्यास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांनी मंजूरी दिली. यासाठी मी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत होतो. विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार साहेब, शिक्षणमंत्री मा.ना.वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन आभार मानले.