मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गंगापूर (जि.औरंगाबाद) तालुक्यातील काकासाहेब शिंदे या तरूणाने जलसमाधी घेवून आपले जीवन संपवले

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गंगापूर (जि.औरंगाबाद) तालुक्यातील काकासाहेब शिंदे या तरूणाने जलसमाधी घेवून आपले जीवन संपवले

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कायगाव येथील गोदावरी पात्रात गंगापूर (जि.औरंगाबाद) तालुक्यातील काकासाहेब शिंदे या तरूणाने जलसमाधी घेवून आपले जीवन संपवले. आज घडलेली ही घटना अत्यंत दु:खद व दुर्देवी आहे. मराठा आरक्षणासाठी गंगापूर तालुका सकल मराठा समाजाने कालच प्रशासनाला जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. मात्र इशारा देवूनही सरकार, प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही. एकही जबाबदार अधिकारी त्या ठिकाणी नव्हता. मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेले आंदोलन हातळतांना सरकारला पूर्णपणे अपयश येत असून यामुळे आज एक निरपराध तरूणाचा बळी गेला आहे. आता तरी सरकारने यातून धडा घेवून मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घ्यावा व मराठा समाजाचा आक्रोश समजून ठोस कृती करावी…

काकासाहेब शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

Leave a comment