सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्यावतीने अभियांत्रिकीच्या नामांकित संस्थांमध्ये आयआयटी तसेच एनआयटीसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र महाराष्ट्रात मुंबई, पुणे व नागपूर या तीन ठिकाणीच जेईई-ऍडव्हान्स ही परीक्षा घेण्यात येत होती. त्यामुळे या परीक्षेसाठी औरंगाबादेतही केंद्र सुरू करावे अशी मागणी मी 2016 मध्ये तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री, तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्याकडे केली होती. माझ्या या मागणीची दखल घेत मनुष्यबळ विकास मंत्रालयाने परिपत्रक प्रसिध्द करून औरंगाबादेत जेईई-ऍडव्हान्स परीक्षा केंद्र सुरू केले. मराठवाड्यासह महाराष्ट्रातूनही ही परीक्षा देण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांना 400 ते 500 कि.मी.प्रवास करून मुंबई, पुणेसारख्या दूरच्या व महागड्या शहरात जावे लागत होते. त्यासाठी त्यांना 8 ते 10 हजार रूपये खर्च करावा लागत होता.