सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेली पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) माध्यमातून अनुसूचित जातीच्या एम.फिल. व पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. बार्टीच्यावतीने 2018 या शैक्षणिक वर्षात 408 विद्यार्थ्यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी (फेलोशिप) निवड करण्यात आली होती. त्यापैकी 105 विद्यार्थ्यांना बार्टीने 3 मार्च 2020 रोजी फेलोशिप मंजूर केली तर 303 विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर झालेली नव्हती.
यासंदर्भात 5 जुलै 2020 रोजी सामाजिक न्याय मंत्री मा.ना.धनंजयजी मुंडे यांना सदरील विद्यार्थ्यांचा प्रश्न निदर्शनास आणून दिला. ना.धनंजयजी मुंडे यांनी देखील माझ्या मागणीची तात्काळ दखल घेत या 303 विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केली. त्यामुळे दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या फेलोशिप मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.