राज्यातील शासकीय रूग्णालयात काम करणारे निवासी डॉक्टर सुध्दा कोरोनाशी लढा देण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. अनेक ठिकाणी या डॉक्टरांना ‘डबल ड्युटी’ करावी लागत आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय वैद्यकीय रूग्णालयात काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांना विद्यावेतन वाढवून द्यावे, अशी मागणी मी 9 जुलै 2020 रोजी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार व वैद्यकीय शिक्षण मंत्री मा.ना.अमितजी देशमुख यांच्याकडे केली. त्याचा परिणाम म्हणून 12 ऑगस्ट 2020 रोजी मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत राज्यातील 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व 3 दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10 हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय झाला.