मी एक विधवा असून मला दोन मुलं आहेत. मी आजाराने त्रस्त होते. माझ्यावर दोन महत्वाच्या शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता होती, मात्र आर्थिक स्थिती चांगली नसल्याने मला हे शक्य नव्हते. आदरणीय आ. सतीशभाऊ चव्हाण हे भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य सेवेचे कार्य करतात ह्याची मला माहीती मिळाली आणि आदरणीय भाऊ श्री. शिवाजी महाविद्यालय, परभणी येथे काही कामानिमित्त आले असता त्यांची भेट घेतली.

भाऊंनी माझ्या प्रकृतीची विचारपूस करून तातडीने त्यांच्या आरोग्य सेवकांच्या माध्यमातून मुंबई येथे हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमीट केले. दोन ऑपरेशनचा संपूर्ण खर्च भाऊंच्या माध्यमातून तर झालाच पण मी आणि माझ्यासोबत आलेल्या नातेवाईकांची राहण्याची व भोजनाची उत्तम व्यवस्था केली. मदत करणारे आदरणीय सतीशभाऊ चव्हाण, उपचार करणारे डॉक्टर आणि काळजी घेणारे भाऊंचे आरोग्यसेवक यांचे मी मनापासून आभार मानते.

श्रीमती राणी प्रसाद दुधारे, रा. हट्टा, ता. वसमत, जि. हिंगोली