मला तोंडाचा कर्करोग झाला होता. माझी परिस्थिती अतिशय गरीब असल्यामुळे मी प्रचंड हताश व निराश झालो होतो. यातच मला माझ्या मित्राने मा.अमरसिंह पंडित साहेबांशी संपर्क करून दिला. भैय्या-साहेबांनी आदरणीय सतीशभाऊ चव्हाण यांच्याशी संपर्क करून दिला आणि माझे नशीबच बदलले. आदरणीय सतीशभाऊंनी मला मुंबई येथे उपचारार्थ पाठविले. कै.भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझ्यावर कर्करोगाची शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आली. यातच मला आयुष्याचे एक सत्य समजले ते असे की, कर्करोग झाला असे कळताच जवळचे नातेवाईक व मित्रही आपल्यापासून दूर पळतात परंतु अशाही वेळी मा.अमरसिंह पंडित साहेब, आ.सतीशभाऊ चव्हाण देवासारखे धावून आले. आज त्यांच्यामुळेच मला जीवदान मिळाले. त्यांचे उपकार मी जन्मभर विसरु शकणार नाही.

– रवी दिलीप गवळी , रा.माळीवेस, ता.जि.बीड