कोरोना काळात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बायर क्रॉप सायन्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद जिल्ह्यातील चार हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांना बाजरी बियाणे मोफत वाटप करण्यात आले. यासाठी जिल्ह्यातील ज्या भागात बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते अशा गावांची निवड करून त्याठिकाणी असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रत्येकी दीड किलो बाजरी बियाणे मोफत वाटप करण्यात आले. यामध्ये औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी, हातमाळी, जळगांव, चित्तेपिंपळगाव, खोडेगाव, कचनेर, कन्नड तालुक्यातील पिशोर, खतखेडा, नाचनवेल, करंजखेडा, मोहरा, पैठण तालुक्यातील थेरगाव, हार्शी, कडेठाण, आडूख, वडजी, फुलंब्री तालुक्यातील वानेगाव, वारेगाव, भोयगाव, कोलते टाकळी, डोंगरगाव, सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, अंधारी, भराडी आदी गावांचा समावेश होता.