औरंगाबाद शहरातील शासकीय महाविद्यालय व रूग्णालयातील (घाटी) डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे मार्च व एप्रिल 2020 या महिन्यांचे वेतन शासनाकडे थकीत होते. याठिकाणी कोरोना बाधितांवर उपचार सुरू असल्याने घाटीतील डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, चतुर्थश्रेणी कर्मचारी आपला स्वत:चा जीव धोक्यात घालून उत्स्फूर्तपणे काम करून रूग्णांची योग्य ती काळजी घेत होते. मात्र वेळेवर पगार न झाल्याने त्यांच्या समोर मोठीच आर्थिक अडचण निर्माण झाली होती. 13 मे 2020 रोजी उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यावर मा.अजितदादांनी घाटीतील अधिकारी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  वेतन त्वरित अदा करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले. व डॉक्टरांच्या थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लागला.