मान्यताप्राप्त व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीसाठी पालकांची उत्पन्न मर्यादा वाढविण्यात यावी अशी मागणी मी शासनस्तरावर वेळोवेळी केली. यासंदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित करून या प्रश्नाला वाचा फोडली. अखेर शासनाने 31 मार्च 2018 रोजी शासन निर्णयाव्दारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीसाठी पालकांची उत्पन्न मर्यादा रूपये सहा लाखांवरून, रूपये आठ लाख करण्याचा निर्णय घेतला गेला.