आदरणीय शरद पवार साहेबांच्या संसदीय कारकिर्दीला दि.22 फेबु्वारी 2017 रोजी पन्नास वर्ष पूर्ण झाले. या पाच दशकांमध्ये आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते अनेकविध निर्णय झाले. अनेक प्रकल्प उभे राहिले, सर्वसामान्य माणसांचा विकास केंद्रस्थानी मानून आदरणीय शरद पवार साहेबांचे कार्य व विचार महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता साहेबांच्या कायदेमंडळातील पन्नाशीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने सुवर्णगाथा-50 राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व तसेच शालेय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आदरणीय खा.सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या स्पर्धेची मराठवाडा विभागाचा मुख्यसमन्वयक म्हणून काम करण्याची संधी मला ताईंनी दिली. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात या दोन्ही स्पर्धा आम्ही यशस्वीपणे आयोजित केल्या. बारामती येथे या स्पर्धेच्या झालेल्या महाअंतिम फेरीत मराठवाड्याला 11 पारितोषिके मिळाली.