स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर (स्पा) ही आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था औरंगाबाद येथे स्थापन करण्यासंदर्भात शासन स्तरावर तातडीने कार्यवाही करावी, यासाठी मी शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करीत आहे. 21 जून 2018 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ‘स्पा‘ औरंगाबादेत सुरू करण्यासंदर्भात शासन स्तरावर संथ गतीने कार्यवाही होत असल्याचे सांगितले. आपण स्वतः औरंगाबादला स्कूल ऑफ प्लॅनिंग अँडआर्किटेक्चर (स्पा) देण्याची घोषणा केली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच यासंदर्भात डिसेंबर 2017 च्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. यासाठी वेळोवेळी शासनस्तरावर अजूनही पाठपुरावा सुरू आहे.