‘संविधान बचाओ, देश बचाओ!’ या मोहीमेअंर्गत जेएनयूतील विद्यार्थी संसदेचे माजी अध्यक्ष व एआयएसएफचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कन्हैय्या कुमार यांची औरंगाबाद शहरात 9 डिसेंबर 2018 रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. आमखास मैदान येथे झालेल्या या सभेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.