संरक्षण दलातील करिअर

Combined Defence Service ( सी.डी.एस.) Examination संरक्षण दलात अधिकारी संवर्गाचे पद मिळविण्यासाठी परीक्षा द्यावी लागते.

पात्रता : अविवाहित पुरुष किंवा महिला लेखी परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. नौदल (Navel Academy ) , वायुदल (Air Force ), इंडियन मिलिटरी अकादमी व ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीसाठी पुरुष उमेदवारांना परीक्षा देता येते तर महिला उमेदवार ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीची परीक्षा देऊ शकतात. अकादमीत प्रवेश करतेवेळी उमेदवाराचे वय किमान 19 वर्षे असावे लागते. निवड प्रक्रिया साधारणपणे दीड वर्षे चालण्याची शक्यता असल्याने, किमान वयोमर्यादेच्या दीड वर्षे अगोदरच अर्ज करण्याची प्रक्रिया करणे हितकारक ठरते. कमाल वयोमर्यादा वेगवेगळ्या विभागासाठी निरनिराळी आहे.

पदवीच्या अंतिम वर्षाला किंवा पूर्व अंतिम वर्षाला शिकत असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. इंडियन मिलिटरी अकादमी ( आयएमए) व ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी ( एटीए) साठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी अथवा समकक्ष पात्रता आवश्यक. नेवल अकादमीसाठी अभियांत्रिकी पदवीधर किंवा फिजिक्स व गणित घेऊन बी.एस्सी. परीक्षा उत्तीर्ण उमेदवार पात्र असतात. त्याचप्रमाणे एअरफोर्स अकादमीसाठी अभियांत्रिकी पदवीधर किंवा बारावी परीक्षेला फिजिक्स , mathematics घेऊन कोणत्याही शाखेत पदवी मिळविणारा पात्र असतो. या शिवाय पुरुष व महिला उमेदवारांसाठी निर्धारित केलेले शारीरिक क्षमतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक असते. पात्रतेच्या सविस्तर अटींच्या माहितीसाठी Employment News वृत्तपत्रातील संबंधित जाहिरातीचा अभ्यास करावा. एप्रिल व सप्टेंबरमध्ये या जाहिराती प्रसिद्ध होतात.

अर्जाची पद्धत : विहित नमुन्यातील अर्ज भरावे लागतात. ( यू.पी.एस.सी. परीक्षेप्रमाणे ) हे अर्ज ठराविक पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असतात.

लेखी परीक्षा : साधारणपणे प्रत्येक वर्षी फेब्रुवारी आणि सप्टेंबरमध्ये परीक्षा होते. महाराष्ट्रात मुंबई व नागपूर येथे परीक्षा केंद्रे आहेत. प्रत्येकी १०० गुणांचे तीन ( इंग्रजी, जनरल नॉलेज आणि Elimentry Maths ) पेपर्स असतात. प्रत्येक विषयासाठी दोन तास वेळ असतो. प्रश्नाचे स्वरूप बहुपर्यायी (Multiple Choice) स्वरूपाचे असते. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश (वन थर्ड ) मार्क वजा होतात. ( निगेटिव्ह मार्किंग ) एस एस बी ( सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड ) लेखी परीक्षेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी आमंत्रित केले जाते. एसएसबी इंटरव्यू प्रक्रिया दोन भागात होते.

पहिला भाग ( प्रिलिमिनरी स्क्रीनिंग ) : यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी आणि पिक्चर परसेप्शन व डिस्कशन टेस्ट असे दोन विभाग असतात. इंटिलिजन्स टेस्ट लेखी परीक्षा ५० प्रश्नांची असते. या दोन विभागातील परीक्षांच्या निकालावर आधारित उमेदवारांची पात्रता ठरवली जाते. अपात्र उमेदवारांना दुसऱ्या भागाच्या परीक्षेसाठी अपात्र ठरवून संपूर्ण निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येते.

दुसरा भाग : सायकोलॉजिकल टेस्ट, ग्रुप टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्यू : टेस्ट परीक्षा तीन दिवस चालतात. यानंतर चौथा दिवस संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर उमेदवाराची मुलाखत घेतली जाते. या मुलाखतीनंतर उमेदवारांची निवड जाहीर होते. निवड झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीचा कालावधी चार ते पाच दिवसांचा असू शकतो.

एनसीसी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांसाठी भारतीय सैन्य दलात करिअर ( एनसीसी स्पेशल एन्ट्री )

) आर्मी मध्ये कमिशन पात्रता : अविवाहित पुरुष /महिला कोणत्याही शाखेची पदवी किमान ५० टक्के गुणांसाहित प्राप्त. एनसीसी च्या Certificate परीक्षेमध्ये किमान बी श्रेणी असणे आवश्यक. सिनिअर एनसीसीमध्ये दोन वर्ष सेवा, वय २४ वर्षे ३ महिन्यापेक्षा कमी. उंची १५७ सेमी. किमान पुरुषांसाठी आणि महिलांसाठी १५२ सेमी. निवड पद्धत : विहित नमुन्यातील अर्ज भरावा लागतो. Employment News अंकात नमुना अर्ज व इतर माहिती प्रसिद्ध केली जाते. अर्जाची छाननी झाल्यानंतर उमेदवारांना एसएसबी ( सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड) इंटरव्ह्यूसाठी आमंत्रित करण्यात येते. एसएसबी इंटरव्ह्यूची पद्धत Combind Defence Services च्या करिअर बद्दल माहिती देताना विशद केली आहेच.

एअर फोर्स ( वायुदल) ज्या पुरुष व्यक्ती एनसीसी चे certificate प्राप्त आहेत, त्यांच्यासाठी उत्तम संधी आहे. ते पायलट बनू शकतात.

पात्रता : १२ वी परीक्षेला पदार्थ व विज्ञान घेऊन पुढे पदवीधर झालेली व्यक्ती पात्र समजली जाते. विशिष्ट शारीरिक क्षमता निकष लागू . वायू दलात प्रवेश करतेवेळी वय २३ वर्षांपेक्षा जास्त नसावे. या बाबत अधिक माहिती एनसीसी च्या एअर फोर्स शाखेकडून मिळू शकते.

निवड पद्धत : प्रथम वरीलप्रमाणेच एसएसबी इंटरव्ह्यू प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक. त्यानंतर पायलट aptitude test द्यावी लागते. टेस्ट उमेदवाराला आयुष्यात एकदाच देता येते.