शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 14 सप्टेंबर 2015 रोजी राज्यभर ‘जेलभरो’ जन आंदोलन करण्यात आले. मा.ना.दिलीपजी वळसे पाटील व माझ्या नेतृत्वाखाली औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करमाड येथे सदरील आंदोलन करण्यात आले. करमाड गावातील औरंगाबाद-जालना मार्गावर या आंदोलनाला पाच हजार शेतकरी बांधव शेकडो बैलगाड्या आणि शेकडो जनावरे घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते.