शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन अनुदानाची प्रलंबित रक्कम अदा करण्यासंदर्भात 8 डिसेंबर 2016 रोजी हिवाळी अधिवशेनात मी तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. सन 2013 पासून राज्यात विशेषत: मराठवाड्यात सूक्ष्म सिंचनाचे कोट्यावधी रूपयांचे अनुदान प्रलंबित होते. सततची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना व्याजासह अनुदानाची थकीत रक्कम वाटप करण्यात यावी, अशी आग्रही मागणी माझ्यासह तत्कालीन आ.अमरसिंह पंडित यांनी विधान परिषदेत केली. यासंदर्भात विधान परिषदेच्या सभापतींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक होऊन या बैठकीत अनुदानाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला.