वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशभरात नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी मराठवाड्यात औरंगाबादसह नांदेड, लातूर, बीड याठिकाणी देखील परीक्षा केंद्र देण्यात यावे, यासाठी मी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत होतो. अखेर माझ्या या प्रयत्नाला यश आले. ‘सीबीएसई’ बोर्डाने नांदेड, लातूर व बीड जिल्ह्याला नीटचे परीक्षा केंद्र मंजूर केले.