दहावी, बारावी नंतर शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध असतात. मात्र ग्रामीण भागातील पालकांना, विद्यार्थ्यांना त्यांची माहिती नसते. या संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहिती व्हाव्यात म्हणून मराठवाड्यात विविध ठिकाणी ‘वेधभविष्याचा’ या करीअर मार्गदर्शन मेळाव्यांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांचा असंख्य विद्यार्थ्यांना फायदा झाला.