लघुउद्योग

उद्योगव्यवसाय करण्याची अनेकांची इच्छा असते. उद्योग करायची ज्यांनी ठरवले आहे, त्यांनी आधी उद्योगाबाबत योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. शिवाय अनेक बाबींचा अभ्यास होणेही आवश्यक आहे. उद्योगासाठी केवळ चर्चा करून उपयोग नाही तर गरज आहे ती आत्मपरीक्षण, चिंतन कृती आणि संघर्ष करण्याची गुप्त सृजनशीलतेचा वापर करून स्वत:तील गुणदोष ओळखून, अचूक गुणांचा वापर करून उद्योगव्यवसायात यशस्वी होण्याची. उद्योजक होण्यासाठी उत्पादनाची निवड, त्याची मागणी, त्यासाठी बाजारपेठेची उपलब्धता या सर्व गोष्टी जरी आवश्यक असल्या तरी नवनिर्मिती इर्षां, धडपड करण्याची तयारी, कष्ट करण्याची वृत्ती, सामथ्र्य असायलाच हवे.

जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र व जिल्हा उद्योजकता केंद्र ह्या सारखे सरकारी कार्यालये उद्योजकांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्यासाठी कार्यरत असतात. तुम्ही ठरवलेल्या व्यवसायाच्या लेखी आराखडा इथे घेऊन गेल्यास ते भांडवला पासून ते व्यवसाय सुरळीत चालू होई पर्यंत आपणास सहकार्य करतात.

लघुउद्योगासंबंधित काही उद्योग खालीलप्रमाणे :

 • इंटरनेट सेंटर
 • इलेक्ट्रीशियन
 • ऑटो रिपेअरिंग
 • जॉब वर्क्स
 • नर्सरी
 • नर्सरी
 • मोटार वायडिंग
 • वॉच रिपेअरिंग
 • Fabrication उद्योग
 • I.Q.F-project
 • फिनेल निर्मिती उद्योग
 • कोल्ड स्टोरेज उद्योग
 • रेशीम उद्योग
 • सोलर उपकरण उद्योग
 • डाटा एन्ट्री
 • चप्पल व बूट विक्री
 • व्हिडिओ शूटिंग
 • P.V.C
 • Rubber Stamp
 • ब्युटीपार्लर
 • व्यांयांमशाळा
 • विमा क्षेत्र
 • जनरल इंजिनीरिंग कंपनी
 • एकाउंट कंपनी
 • Event management
 • सॉफ्टवेअर व वेब साईट कंपनी
 • कॉल सेंटर