रोजगार व स्वयंरोजगार

आपली ओळख सांगायची तर माणसाला एक सार्वजनिक चेहरा हवा असतो. आपण काय करता असं दुसऱ्यानं विचारल्यावर पटदिशी आपला व्यवसाय माणूस सांगतो. नोकरी करणाऱ्यापेक्षा अर्थातच स्वत: चा व्यवसाय करणारा अधिक आत्मविश्र्वासाने बोलतो. मराठवाडा विभागाच्या पदवीधर मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून वावरत असताना हे प्रकर्षाने जाणवते. मुळात आमदार सतीश चव्हाण हेच स्वत: स्वयंरोजगाराच्या मार्गातून येऊनच समाजात स्थिरावलेले आहेत.

पदवीधराने केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार निवडावा आणि आपले आयुष्य अधिक उन्नत करावे असा चव्हाणांचा आग्रह असतो. याचा अर्थ नोकरी करणे म्हणजे वाईट असे नाही. आपल्या बुद्धीमत्तेच्या व कौशल्याच्या जोरावर माणसाने आपली ओळख निर्माण करायची असते. ती प्रत्येकाला करता यावी, यासाठी आमदार सतीश चव्हाण यांनी संबंधितांना नेहमीच संदर्भ म्हणून उपयोगाचे पडेल असे संकेतस्थळ निर्माण करण्याचे ठरविले आहे.

या संकेतस्थळावर स्वयंरोजगाराविषयी थोडक्यात परंतु नेमकी अशी माहिती दिलेली आहे. पदवीप्राप्त तरूणाला जिद्दीच्या बळावर व्यवसाय यशस्वी करून दाखवायचा असतो. त्याची ही उमेद कुठेच कमी पडू नये, या उद्देशाने सरकार, उद्योगक्षेत्र आणि व्यवसायाचे लाभार्थी यासंबंधी येथे माहिती दिली जात आहे.

राज्य शासनाचे उद्योग खाते अनेक कल्याणकारी योजना राबविते. स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना केली गेलेली आहे. लघु, मध्यम व मोठया उद्योगसमूहांची नोंदणी करणे एवढेच जिल्हा उद्योग केंद्रांचे काम असते असे नाही, तर बीजभांडवलापासून ते कर्ज सुविधा मिळविण्यापर्यंत मार्गदर्शन करण्याचे काम केले जाते. अनेकांना पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेचा लाभ घ्यावा अशी इच्छा असते. परंतु, केवळ कर्ज उचलून उपयोग नसतो. तर, त्या भांडवलाचा म्हणा किंवा कर्जसुविधेचा लाभ भविष्यात कसा होत राहील, हे कळत नाही. त्यामुळे कर्ज मिळूनही अनेक जण अडचणीत सापडतात. ही स्थिती लक्षात घेऊन आमदार सतीश चव्हाण यांनी स्वयंरोजगारासाठी कोणकोणत्या पातळीवर सहकार्य मिळू शकते, त्याचबरोबर अचूक सल्ला कुठे मिळू शकतो, हेही या ठिकाणी खास करून सांगितले आहे.

उद्योजकीय मानसिकता वाढीस लागणे ही नेहमीच काळाची गरज असते. ती लक्षात घेऊनच आमदार चव्हाण यांनी संकेतस्थळाचे हे व्यासपीठ अभिनव पद्धतीने सर्वांसाठी खुले केले आहे.

उद्योग निवडून तो सुरू करताना मनाची उभारी तितकीच मोठी असावी लागते. यासाठी तशी मानसिकता घडविण्याचे मार्गदर्शन करणारी स्वायत्त संस्था राज्यात कार्यरत आहे. महाराष्ट्र सेंटर फॉर इंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट अर्थात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही संस्था महत्वाचे कार्य करीत आहे. इच्छुकांना या संस्थेकडून आवश्यक ती माहिती व प्रशिक्षण मिळू शकते. mced.nic.in, www.dcmsme.gov.in, NSIC

एमसीईडीप्रमाणेच नवउद्योजकांना प्रशिक्षण व व्यावसायिक मार्गदर्शन करणारी मिटकॉन ही पुणेस्थित कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक ठिकाणी शाखा आहेत. त्या त्या विभागातील गरजूंना व्यवसायाच्या तंत्राबद्दल ज्ञान मिळावे, यासाठी मिटकॉन अनेक अभ्यासक्रम व कार्यशाळांचे उपक्रम राबवित असते. अधिक माहितीसाठी www.mitconindia.com

रोजगार व स्वयंरोजगाराच्या संदर्भात शासनाकडे अनेक योजना आहेत, ज्या सर्वांसाठी उपयुक्त आहेत. परिपूर्ण माहितीसाठी शासनाच्या उद्योग खात्याने तयार केलेल्या रोजगारवाहिनी या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी. ese.mah.nic.in

देशातील आम जनतेला रोजगार व स्वयंरोजगाराचा मार्ग दिसावा, यासाठी केंद्र सरकार तसे आपले धोरण नेहमी अद्ययावत करत असते. देशातील लहानमोठया उद्योजकाला संपूर्ण जगाची द्वारे खुली आहेत. हे लक्षात घेऊन उद्योग खात्याने मार्गदर्शनाची व्यवस्था केलेली आहे. याबद्दल अधिक माहितीसाठी dget.nic.in