राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट व राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्यावतीने औरंगाबाद जिल्ह्यात विविध शासकीय रूग्णालय, खाजगी रूग्णालयातील डॉक्टर, जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांना जवळपास दहा हजार ‘फेस शिल्ड’चे मोफत वाटप करण्यात आले. औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालय व रूग्णालयात ‘फेस शिल्ड’वाटप प्रसंगी अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, डॉ.अरविंद गायकवाड, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हा अध्यक्ष डॉ.धर्यशील पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री.मयूर सोनवणे आदींची तर जिल्हा परिषदेत ‘फेस शिल्ड’ वाटप प्रसंगी जिल्हा परिषदेचे सभापती श्री.किशोर बलांडे, श्री.संतोष कवडे, श्री.दत्तात्रय घोलप, डॉ.अविनाश येळीकर आदींची उपस्थिती होती