कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेस वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी मी 10.48 लाखाचा आमदार निधी दिला. या निधीतून कोरोना बाधितांवर उपचार व्हावेत यासाठी याठिकाणी सहा मल्टी पॅरा मॉनिटर व चार ईसीजी मशिन माझ्या निधीतून देण्यात आल्या. सदरील यंत्रसामुग्री याठिकाणी उपलब्ध झाल्याने कोरोना बाधित रूग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात येत आहेत.