राष्ट्रवादी काँगेसपार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा.शरद पवार साहेबांच्या संसदीय कारकिर्दीस पन्नास वर्ष पूर्णझाल्याबद्दल दि.29 जुलै 2017 रोजी त्यांचा मराठवाड्याच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात केंद्रीय मार्ग परिवहन व महामार्ग, नौकानयन मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते आदरणीय शरद पवार साहेबांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री मा.शिवराज पाटील चाकूरकर तर सन्माननीय पाहूणे म्हणून तत्कालीन विधानसभेचे अध्यक्ष मा.हरिभाऊ बागडे आदींसह मराठवाड्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.