राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरी व ग्रामीण भागात मिळून जवळपास 72 हजार आशा स्वयंसेविका व सुमारे 3500 पेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत. कोरोनाच्या संकट काळात राज्यात डॉक्टर, पोलिसांप्रमाणेच आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक देखील आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत. त्यामुळे त्यांना मिळणार्या मोबदल्यात वाढ करावी अशी मागणी 24 जुलै 2020 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री मा.ना.राजेशजी टोपे यांच्याकडे केली होती. अखेर शासनाने 17 जुलै 2020 रोजी शासन निर्णय निर्गमित करून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला.